राज्यांमधल्या सहकारी संस्थांचा एकसमान आणि संतुलित विकास व्हावा, यासाठी सरकार विशेष उपाययोजना करत असल्याचं सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत बोलत होते. देशातल्या सहकारी संस्थांच्या विकासात असलेला प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी सरकार पावलं उचलत असून राष्ट्रीय सहकारी डेटाबेस विकसित करण्याचं काम जवळजवळ पूर्ण झालं त्यांनी यावेळी सांगितलं. प्रदेशानुसार वर्गवारी केलेल्या देशभरातल्या सहकारी संस्थांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले.
Site Admin | February 13, 2025 1:14 PM | Minister Amit Shah
सहकारी संस्थांच्या एकसमान आणि संतुलित विकासासाठी सरकारच्या विशेष उपाययोजना
