माओवाद्यांनी शस्त्रं टाकून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. छत्तीसगढच्या रायपूर इथे आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. छत्तीसगढला ३१ मार्च २०२६पर्यंत नक्षलमुक्त करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला असून तो पूर्ण करण्यासाठी पोलीस नक्षलविरोधी मोहीम राबवत आहेत. त्यासोबत छत्तीसगढ सरकारने आत्मसमर्पणासाठी उत्तम धोरण तयार केलं असून आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांचं पुनर्वसनही केलं जाणार आहे, असंही शहा यावेळी म्हणाले.
Site Admin | December 15, 2024 8:10 PM | Minister Amit Shah