लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथं आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते भरड धान्य पेरणी करून जिल्ह्यात २०० हेक्टर क्षेत्रावर भरड धान्य पेरणी करण्याचा प्रारंभ झाला. राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढाकारानं जिल्ह्यात भरड धान्य उत्पादन वाढवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवला जात आहे.
भरड धान्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं अध्यक्ष पाशा पटेल यांनी याप्रसंगी सांगितलं.