येत्या काळात प्रत्येक गिरणी कामगाराला घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या या घरांसाठी अर्ज केलेल्या १ लाख ६५ हजारांपैकी १ लाख १८ हजार अर्ज वैध ठरले आहेत. त्यांना लवकरच घरं दिली जातील, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज दिली. गिरणी कामगारांसाठीच्या घरांचं बांधकाम करणाऱ्या विकासकांना पत्र वाटपाच्या कार्यक्रमात मुंबईत ते बोलत होते. या १५ लाखाच्या घरामधले साडे ५ लाख रुपये सरकार भरणार असून उरलेले साडे ९ लाख रुपये गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांना भरावे लागतील. यात ३०० चौरस फुटाचं घर आणि इतर सोयी सुविधा असतील.
Site Admin | October 14, 2024 7:10 PM | atul save | Mill Worker