डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बिना भेसळीचं दूध उत्पादन ही काळाची गरज – मंत्री पंकजा मुंडे

बिना भेसळीचं दूध उत्पादन ही काळाची गरज असून त्यासाठी या क्षेत्रातल्या संशोधकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नागपुरात केलं. माफसू अर्थात महाराष्ट्र पशू विज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात वॅन्कॉन अर्थात वर्ल्ड ऍनिमल न्यूट्रिशन कॉन्फरन्सच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या तीन दिवसीय परिषदेतून व्यावहारिक उपाय सुचवले जातील असं त्या म्हणाल्या. 

जगामध्ये भारत सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे तर महाराष्ट्र हा दूध उत्पादनामध्ये सातव्या क्रमांकावर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा