येत्या दहा वर्षात जगातल्या एकूण दूध उत्पादनापैकी एक तृतियांश उत्पादनाचा वाटा उचलण्याचं भारताचं उद्दीष्ट आहे, असं गुजराथ सहकारी दूध विपणन संघ म्हणजेच अमूल संघाचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना मेहता यांनी अमेरिकेनंतर आता युरोपात अमूल आपली ओळख निर्माण करण्याच्या तयारीत असल्याचं नमूद केलं. येत्या काळात दोन लाखांहून अधिक गावांमध्ये दूध सरकारी संघ स्थापन करायच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीची मेहता यांनी प्रशंसा केली.
Site Admin | November 26, 2024 3:15 PM | Milk Production