मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईच्या खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. गेल्या रविवारी रेगे यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं होतं.
मुंबई संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून मिलिंद रेगे यांची ओळख होती. प्रथम श्रेणीतले ५२ सामने खेळणाऱ्या रेगे यांनी १२६ गडी बाद केले होते. १९७० मध्ये मिलिंद रेगे यांनी मुंबई रणजी संघाचं कर्णधारपद भूषविलं होते. निवृत्तीनंतर रेगे यांनी मुंबई क्रिकेट संघटना- MCA चे निवड समितीत सदस्य, मार्गदर्शक आणि निवड समितीचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलं होते. त्यांच्याच कार्यकाळात रणजीसाठी मुंबईच्या संघात सचिन तेंडुलकर याला प्रथम संधी मिळाली होती.