डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

INSV Tarini : भारतीय नौदल कमांडर दिलना आणि रूपा ए यांची ऐतिहासिक कामगिरी

सागर परिक्रमा २ मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात आय एन एस व्ही तारिणी नौकेमधून केप हॉर्न ओलांडत भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केप हॉर्न हे दक्षिण अमेरिकेचं दक्षिणेकडचं टोक आहे. नौकापटूंना दक्षिणी सागराच्या या भागात नेहमी आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो. केप हॉर्न ओलांडण्याच्या या कामगिरीमुळे नौदलाच्या या दोन अधिकाऱ्यांना ‘केप हॉर्नर्स’ हा नौकापटूंसाठीचा बहुमान प्राप्त झाला आहे. केप हॉर्न हे ठिकाण अंटार्क्टिका पासून ४३२ सागरी मैल एवढ्या अंतरावर आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा