तेलंगणातल्य़ा अनेक भागात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्का जाणवले. रिक्टर मापकावर त्याची तीव्रता पाच पूर्णांक तीन दशांश नोंदली गेली. सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी जाणवलेल्या या भूकंपाचं केंद्र मुलुगु जिल्ह्यात होतं. करीमनगर, पेद्दापल्ली, जनगाव,महबूबाबाद, हनुमकोंडा वरंगळ, आणि भद्राद्री कोथागुडम या जिल्ह्यांमधे हा धक्का जाणवल्याचं राष्ट्रीय भूगर्भ संशोधन केंद्रानं सांगितलं. भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही.
महाराष्ट्रात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागातही हा धक्का जाणवल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.