आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आसाममधील भूकंपाची तीव्रता ४ पूर्णांक २ रिक्टर स्केल इतकी होती. आसामच्या मध्यवर्ती भागात भूकंपाचे केंद्र होते. ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्या लगत असलेल्या उदलगुडी जिल्ह्यात सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपांचे धक्के जाणवले. यात कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याची अद्याप नोंद नाही. तर जम्मू-काश्मीरमधल्या दोडा जिल्ह्यात पहाटे ६ वाजून १४ मिनिटांनी ४ पूर्णांक ३ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्याचे केंद्र गुंडोह येथे होते.