मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मायक्रोसॉफ्ट भारतात करणार असलेल्या गुंतवणुकीबाबत आणि विस्ताराबाबत प्रधानामंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. नाडेला यांच्याबरोबर तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.