माहिती प्रसारण मंत्रालयानं कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी iGOT लॅब सुरू केली आहे, अशी माहिती विभागाचे राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी दिली. मंत्रालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत यावर नोंदणी करण्याचे आदेश मंत्रालयानं दिले आहेत. विविध प्रकारे १६ प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करण्याच्या सूचना मंत्रालयानं सर्वांना दिल्या आहेत. प्रत्येक तिमाहीत सर्वाधिक प्रशिक्षण कार्यक्रम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे.
Site Admin | October 15, 2024 8:38 PM