मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज सर्बियाच्या नोवाक जोकोविचने अमेरिकेच्या सेबास्टियन कोर्डा याला ६-३, ७-६ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केलं. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा जोकोविच हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
त्याने रॉजर फेडरर याचा २०१९मधे मियामी स्पर्धेच्या अंतिम चार खेळाडूंमधे स्थान मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू हा विक्रम मोडीत काढला आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जोकोविचची गाठ बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्ह बरोबर पडेल. भारतीय वेळेनुसार आज रात्री बारा वाजता फ्लोरिडा इथे हा सामना होणार आहे.