व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा पारदर्शक असून विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण अभ्यासक्रमासाठी परीक्षा घेतली होती. यात समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे पर्सेंटाईल दाखवल्याचा आक्षेप चुकीचा असल्याचं सरदेसाई यांनी स्पष्ट केलं. ही परीक्षा वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकी दोन सत्रात घेतली होती. त्यामुळे विविध सत्रात समान गुण मिळालेल्या उमेदवारांना वेगवेगळे पर्सेंटाईल मिळाले आहेत. तसंच उमेदवारांना उत्तर तालिकेप्रमाणे काढलेले गुण मिळाले नाहीत, हा आक्षेपही चुकीचा असल्याचं सरदेसाई यांनी स्पष्ट केलं.
Site Admin | June 22, 2024 7:14 PM | MHT CET | सामाईक प्रवेश परीक्षा