म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सोडतीतल्या पात्र लाभार्थ्यांच्या निकटच्या वारसांना सदनिकेचा सशर्त ताबा देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. हा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वार यांनी घेतलेल्या बैठकीत जाहीर केला.
दोन वर्षांपूर्वी काढलेल्या सोडतीतल्या अनेक लाभार्थ्यांचं निधन झाल्याचं आढळून आलं होतं. या रहिवाशांच्या निकटच्या वारसदारांना सशर्त ताबा दिला जाणार आहे. यासाठी इतर नातेवाईकांचं ना हरकत प्रमाणपत्रासह अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता करणं रहिवाशांना अनिवार्य असणार आहे.