म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळानं आज ठाणे शहर आणि जिल्हा, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि मालवण मधल्या १२ हजार ६२६ सदनिकांच्या विक्रीचा शुभारंभ केला. यापैकी १० हजार ४२८ घरं अत्यल्प उत्पन्न गटासाठी, १ हजार ९८१ घरं अल्प उत्पन्न गटासाठी, ८५ घरं मध्यम उत्पन्न गटासाठी तर १३२ घरं उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध असणार आहेत.
या सोडतीबाबतची अधिक माहिती https://housing.mhada.gov.in आणि https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून ०२२ – ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर शंका निरसनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. आपलं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी या सोडत प्रक्रियेत सहभाग घ्यावा.’ असं आवाहन म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केलं आहे.