म्हाडाच्या मुंबईतल्या ३४ वसाहतींमध्ये वन रुपी क्लिनिकच्या सहाय्याने आपला दवाखाना उभारण्यात येणार आहे. यासाठी म्हाडाने मॅजिक डील हेल्थ फॉर ऑल या खाजगी संस्थेच्या वन रूपी क्लिनिकसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. यानुसार म्हाडा संस्थेला दवाखान सुरु करण्यासाठी ४०० चौरस फुटांची जागा उपलब्ध करुन देणार आहे. म्हाडाच्या कुलाबा कफ परेड, चेंबूर, पंतनगर घाटकोपर, कन्नमवार विक्रोळी, आदी वसाहतींमध्ये ही जागा दिली जाणार आहे.
Site Admin | April 3, 2025 3:56 PM | Mhada
म्हाडाचा वन रूपी क्लिनिकसोबत सामंजस्य करार
