राजस्थान आणि गुजरातमधल्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, केरळ, माहे, आणि गुजरातच्या काही भागात उष्ण आणि दमट वातावरण असेल असा अंदाज आहे. तर बिहार , आसाम आणि मेघालयच्या काही भागात जोरदार पाऊस पडेल असं हवामान विभागानं कळवलं आहे. सिक्कीम, झारखंड, ओदिशा, आसाम, मेघालय, नागालँड आणि मणिपूर मधे ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. केरळ, माहे, आंध्रप्रदेश, यानम आणि दक्षिण कर्नाटमधेही हीच स्थिती असेल. तर ईशान्य भारतात तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Site Admin | April 17, 2025 2:47 PM | उष्णतेची लाट | हवामान विभाग
राजस्थान आणि गुजरातमधल्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा
