डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गुजरात, कोकण, गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर अतीवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने आज गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टी आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

 

तसंच मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात आगामी 4 दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, आज झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या प्रदेशात आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, पूर्व राजस्थान आणि कर्नाटकाच्या उत्तर अंतर्गत भागात पुढील 4 दिवसांत मुसळधार पाऊस असेल. आगामी 3-4 दिवसांत नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय इथेही अशीच परिस्थिती राहील, असं हवामान संस्थेनं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा