संपूर्ण पश्चिम किनारपट्टी आणि गुजरातमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, किनारपट्टीसह कर्नाटक, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांसाठी आज अतिमुसळधार आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील चार दिवसांत तेलंगण, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग आणि यानाम, छत्तीसगड, उत्तर कर्नाटकात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशात मॉन्सून सक्रिय झाला आहे, असे भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, आर.के.जेनामानी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.