एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक तत्वानुसार ४३ प्रादेशिक बँकांच्या एकत्रिकरणाची अधिसूचना केंद्रीय वित्तीय सेवा विभागानं जारी केली आहे. त्यानुसार, राज्यात विदर्भ प्रादेशिक ग्रामीण बँक, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँकेत विलीन केली जाईल. १ मे पासून हे विलिनीकरण प्रत्यक्षात येईल. या एकत्रित बँकेचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल.