डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

डीआरआयच्या कारवाईत मेफेड्रोन आणि १ कोटी ९३ लाख रुपयांची रोकड जप्त

डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं तस्करीच्या एका प्रकरणात सोळा किलो मेफेड्रोन हा सायकॅट्रॉपीक पदार्थ आणि सुमारे एक कोटी ९३ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. १९८५ सालच्या NDPS या कायद्याच्या तरतुदीनुसार या प्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हैद्राबादहुन मुंबईला जाणाऱ्या एका बस मधून जाणारे दोन प्रवासी मेफेड्रोन या अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या आधारावरून पाळत ठेवून काल पहाटे या दोन प्रवाशांना अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यानंतर मुंबईतून आणखी तीन संशयितांना रोख रकमेसह ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा