पुरुष हॉकी कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यात उद्या उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. ओमानमध्ये मस्कत इथं ओमान स्टेडियमवर संध्याकाळी साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपांत्य फेरीतला दुसरा सामना पाकिस्तान आणि जपान यांच्यात उद्या होणार आहे. तर या स्पर्धेतला अंतिम सामना ४ डिसेंबर रोजी होईल.
काल झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा ८-१ असा पराभव केला. यात अर्शदीप सिंगने हॅटट्रिक नोंदवली. तर अरैजीत सिंग हुंदल याने भारतासाठी दोन गोल केले.