इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि सुप्रसिध्द चित्रकार दिपक गोरे यांच्या दरम्यान काल नवी दिल्ली इथं सामंजस्य करार करण्यात आला. गोरे यांनी रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित १ हजार १५ तैलचित्र या कला केंद्राला दान करण्यात येणार आहेत. ही चित्रं मिळाल्याबद्दल केंद्राचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी आनंद व्यक्त केला. हा अनमोल कलेचा ठेवा तसंच महत्त्वपूर्ण ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा भावी पिढ्यांसाठी जतन करण्याची आपली वचनबद्धता आहे. हा वारसा अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.असं गोरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
Site Admin | June 18, 2024 10:09 AM | इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र | चित्रकार दिपक गोरे
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि चित्रकार दिपक गोरे यांच्या दरम्यान सामंजस्य करार
