झारखंड विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो यांनी आज दोन आमदारांचे सदस्यत्व रद्द केले. झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे आमदार लोबिन हेम्ब्रोम आणि भाजप आमदार जे पी पटेल पक्षांतरासाठी दोषी आढळले होते. झारखंड मुक्ती मोर्चा चे आमदार लोबिन हेम्ब्रोम यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजमहल मतदारसंघात त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीला उभे राहिले होते. तर भाजपचे आमदार जे.पी पटेल यांनी हजारीबाग मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती.
Site Admin | July 25, 2024 8:22 PM | Jharkhand Assembly