बँक घोटाळ्यातला आरोपी, हिरेव्यापारी मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रसरकार बेल्जियमबरोबर चर्चा करत असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव रणधीर जयस्वाल यांनी दिली. नवी दिल्ली इथं आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. २६ – ११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण हा पाकिस्तानसाठी खणखणीत संदेश आहे, या हल्ल्यातल्या इतर आरोपींना पाठीशी घालणं बंद करावं अशी समज पाकिस्तानला मिळाली आहे, असं ते म्हणाले.
Site Admin | April 17, 2025 8:04 PM | Mehul Choksi
मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रसरकारची बेल्जियमसोबत चर्चा
