सीबीआयच्या विनंतीवरुन फरार हिरे व्यापारी मेहुल चौकसी याला बेल्जियम पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. पंजाब नॅशनल बँकेतल्या साडे १३ हजार कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणी त्याच्याविरोधात मुंबईतल्या न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं होतं. याप्रकरणातला दुसरा आरोपी नीरव मोदीचं लंडनमधून प्रत्यार्पण व्हायचं आहे. घोटाळा उघड होण्याच्या काही दिवस आधी, जानेवारी २०१८ मध्ये तो देशाबाहेर पळून गेला होता.
चौकसी याची अटक हे मोठं यश आहे. गरीबांचे पैसे लुटणाऱ्यांना, हे पैसे परत करावेच लागतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीचं स्पष्ट केलं असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले.