केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक घेतली. हा वार्षिक मेळावा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातला समन्वय वाढवण्यासाठी महत्वाच्या धोरणात्मक बाबींवर सहयोगी चर्चा करण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी एकसंध धोरणं पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ म्हणून काम करत असल्याचं गडकरी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
प्रादेशिक आव्हानांचा सामना करण्यासाठी, सर्वोत्तम पद्धतींचं आदान-प्रदान करण्यासाठी आणि देशभरात परिवर्तनशील धोरणांची एकसमान अंमलबजावणी करण्यासाठी असा संवाद गरजेचा असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे.