भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रात पुन्हा एनडीएचं सरकार आणण्याचं आवाहन केलं आहे. नड्डा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी विधानसभा निवडणुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत एकत्र लढवायची आहे, असं त्यांनी राज्याच्या भाजपा नेत्यांना सांगितलं. निवडणुकीत एनडीएचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी होतील यासाठी काम करण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. नड्डा यांनी आज मुंबईत लालबागचा राजा, चिंचपोकळीच्या चिंतामणी आणि वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देऊन गणपतीचं दर्शन घेतलं.
Site Admin | September 14, 2024 8:08 PM | BJP