केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन तसंच निमलष्करी दल आणि गुप्तचर संस्थांचे उच्चाधिकारी यांच्यात आज जम्मूत बैठक होणार आहे. या बैठकीत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा घेण्यात येणार असून या बैठकीला जम्मू आणि काश्मीरमधले वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित असतील. जम्मूमधल्या सद्यपरिस्थितीचा आढावा घेऊन दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठीची रूपरेषा या बैठकीत आखली जाईल. केंद्रीय गृह सचिवांनी पदभार स्वीकारल्यानंतर जम्मू प्रदेशात केलेला हा पहिलाच सुरक्षा आढावा आहे.
Site Admin | March 9, 2025 6:26 PM | Meeting
केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन तसंच निमलष्करी दल आणि गुप्तचर संस्थांचे उच्चाधिकारी यांच्यात बैठक
