भारतात २०२० मध्ये कोविड -१९ महामारीत अत्याधिक मृत्युदर दर्शवणारा ‘सायन्स ऍडव्हान्सेस’ या नियतकालिकातला अहवाल तथ्यहिन असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. नियतकालिकात प्रकाशित अहवाल चुकीचा असून लेखकांच्या कार्यपद्धतीत गंभीर त्रुटी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. अहवालातील दाव्यात सुसंगती नसून अस्पष्टता आढळते. या अभ्यासातील निष्कर्ष आणि प्रस्थपित कोविड-१९ मृत्युप्रमाण प्रारूप, यात विसंगतीदेखील दिसते. यामुळे हा अहवाल विश्वासार्ह ठरत नाही, असं आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं आहे.
Site Admin | July 20, 2024 7:56 PM | Corona | COVID-19 | India | Science Advances