देशातल्या प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्राने २०२४मधे सुमारे अडीच हजार अब्ज रुपयांची उलाढाल केली , तर जाहिरातीतून मिळणारा महसूल ८ पूर्णांक १ दशांश टक्क्यांनी वाढला आहे. फिक्की आणि अर्न्स्ट अँड यंग या संस्थांनी सर्वोक्षण करुन प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. जाहीर कार्यक्रमांच्या थेट प्रसारणात १५ ट्क्के वाढ झाली तर दूरचित्रवाहिनी, चित्रपट, छापीलमाध्यमं आणि ऑनलाईन गेमिंगचे ग्राहक २ ट्क्क्यांनी कमी झाले असं या अहवालात म्हटलं आहे.
चालू वर्षात या क्षेत्रात ७ पूर्णांक २ दशांश टक्के वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.मुंबईत आज एका कार्यक्रमात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते.
देशात प्रसारमाध्यमांमधे सर्जनशील मजकुरात गेल्या काही दिवसात सातत्याने वाढ होत असून ग्रामीण आणि दुर्गम भागतले प्रतिभावंत कलाकार जगासमोर व्यक्त होत आहेत असं ते यावेळी म्हणाले. फिक्की या व्यापारी आणि उद्योजक संघटनेनं प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्योगाविषयी तयार केलेल्या अहवालाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वेव्ज उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली.