भारत-चीन सीमेवर देम्चोक आणि देप्सांग परिसरांमधे भारताच्या बाजूने गस्त सुरु झाली असल्याचं परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाने सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यम प्रतिनिधींना ही माहिती दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन सैन्य मागं घेण्याबाबात गेल्या २१ ऑक्टोबरला भारत चीनदरम्यान समझोता करार झाला. त्यानुसार ही गस्त सुरु झाली आहे.
युक्रेन – रशिया युद्धात रशियाला मदत केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेने भारतीय कंपन्यावर बंदी घातल्यासंदर्भात जयस्वाल म्हणाले, या संदर्भात सरकार अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं.