केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बद्दल कॅनडाचे उपमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी तिथल्या राष्ट्रीय सुरक्षा स्थायी समितीसमोर केलेल्या आरोपाबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नवी दिल्लीतल्या कॅनेडीयन उच्चा युक्तालयातल्या प्रतिनिधीला काल बोलावून याबाबत निषेध नोंदवला. अशा प्रकारे बेजबाबदार वक्तव्य केल्यास त्याचा उभयपक्षी संबंधावर गंभीर परिणाम होऊ शकतो असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. कॅनडात कार्यरत काही भारतीय अधिकाऱ्यांवर नजर ठेवली जात असल्याचं या अधिकाऱ्यांनी केंद्रसरकारला कळवलं असून, त्याचा जयस्वाल यांनी निषेध केला. कॅनडामधे यंदा दिवाळी निमित्तचे कार्यक्रम रद्द झाले याबाबत ते म्हणाले की दुर्दैवाने तिथलं वातावरण असहिष्णु आणि अतिरेकी बनलं आहे. कॅनडात सध्या वास्तव्याला असलेले भारतीय विद्यार्थी आणि हंगामी कामगार यांच्याकडे सरकारचं लक्ष आहे, असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | November 2, 2024 8:29 PM | Canada | Home Minister Amit Shah