पाकिस्तानने अफगाणिस्तानमधे नागरिकांवर हवाई हल्ले केल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेल्याच्या वृत्तांची दखल भारत सरकारने घेतली असून विशेषतः महिला आणि मुलंही बळी गेल्याचा भारत निषेध करत आहे. आपल्या अंतर्गत समस्यांसाठी शेजाऱ्यांना दोष देणं ही पाकिस्तानची जुनी सवय असल्याची टीका भारतानं केली आहे.
Site Admin | January 6, 2025 8:00 PM | India | Pakistan