डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दूध भेसळ करणाऱ्यांवर ‘मकोका’, कारवाईसाठी कायद्यात सुधारणा

दूध आणि दुग्धोत्पादनामध्ये होणाऱ्या भेसळीची बाब गंभीर असून, अशा प्रकारची भेसळ करणाऱ्यांवर मकोकाअंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील असं- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. या सुधारणांसंबंधीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी काल दिले. दूध भेसळीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 

दुधातील भेसळ तपासण्यासाठी प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा तातडीनं सुरू करावी, पनीरमध्ये ॲनालॉग चीज असल्यास त्यासंबंधीची माहिती दुकानात दर्शनी भागात लावण्यासंदर्भात सूचना द्याव्यात, भेसळी संदर्भात जनतेला तक्रारी नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करावा, तसंच पोर्टल विकसित करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा