बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी सामाजिक चळवळी संपवल्या, त्यामुळे आता त्यांचं राजकारण संपवण्याची वेळ आली आहे, अशी टीका काँग्रेसचे खासदार उदित राज यांनी केली. ते आज लखनौ इथं एका कार्यक्रमात बोलत होते. कांशिराम यांनी बहुजनांचं प्रबोधन करण्यासाठी चळवळ सुरू केली होती, त्यांच्या चळवळीचा आधार सामाजिक न्याय होता, असं उदित राज म्हणाले. देशा मुस्लीम आणि दलित समुदायाचे प्रश्न समान असून दोघांनी एकत्र येत प्रतिकार करायला हवा असंही ते म्हणाले.
Site Admin | February 18, 2025 1:09 PM | Congress | Mayavati
मायावती यांचं राजकारण संपवण्याची वेळ आल्याची काँग्रेसची टीका
