जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताच्या तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांचा मलेशियाच्या पँग रॉन हू आणि सू यीन चेंग या जोडीने २१-१८,१५-२१,१९-२१ असा पराभव केला.
भारताच्या लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी जपानच्या केंता निशिमोटो याच्याशी होणार आहे. लक्ष्य सेनने जपानच्या तकुमा ओबायाशी याला थेट गेममध्ये हरवलं होतं.
पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांचा सामना किट्टिनुपोंग केड्रेन आणि देचपूल पुआवरनुक्रोह यांच्याशी आज होणार आहे. महिला दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि अश्विनी पुनप्पा यांचा सामना मलेशियाच्या पेई की गो आणि मेई झिंग तेओह यांच्याशी होणार आहे.