मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निधीत गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारनं मनरेगासाठी अर्थसंकल्पात ८७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेम्मसानी यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली. कोविड महामारीच्या काळात मनरेगासाठी एक लाख दहा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला, गेल्या पाच वर्षात मजुरीतही ४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यामुळे मजुरीत घट झाल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचं चंद्रशेखर यांनी सांगितलं.