उत्तर प्रदेशात लखनौ इथल्या लोकबंधू रुग्णालयात काल रात्री उशिरा आग लागली, यामुळे रुग्णालय प्रशासनाने तत्काळ कारवाई करत 2 शे रुग्णांना तिथून बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाल्याच वृत्त नाही तसच कोणीही जखमी झालेल नाही .उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी काल रात्री रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसच रुग्णालय प्रशासनाने प्रसंगावधान दाखवल्याबद्दल त्यांच कौतुक केल. प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याच निष्पन्न झाल असून , उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दाखल घेत सखोल तपासाचे आदेश दिले आहेत .