बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे कुणी जबाबदार असतील, त्यांना तातडीनं धडा शिकवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी आज मस्साजोग गावाला भेट दिली आणि देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल, असं शरद पवार म्हणाले. जे घडलं त्यामुळे सर्वसामान्य लोकांना धक्का बसला असून या घटनेच्या खोलात जाऊन तपास करायची गरज त्यांनी अधोरेखित केली. या प्रकरणामुळे जिल्ह्यात दहशत निर्माण झाली असून सर्वांनी एकत्रितपणे या परिस्थितीचा सामना करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
Site Admin | December 21, 2024 2:47 PM | Massajog Sarpanch | NCP Sharad Chandra Pawar Party