भामरागड इथल्या जंगलात नक्षल्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस अंमलदार महेश नागुलवार यांच्या पार्थिवावर आज अनखोडा इथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर हवेत बंदुकीच्या फैरी झाडून नागुलवार यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचा पार्थिव देह अनखोडा या त्यांच्या गावी रवाना करण्यात आलं. भामरागड तालुक्यातल्या दिरंगी आणि फुलनार गावाजवळ काल ही चकमक झाली होती.
त्यांच्या शौर्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 2 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ देण्याची घोषणा केली.