दक्षिण कोरियातील नॅशनल असेंब्लीनं मार्शल लॉ संपविण्याच्या बाजूने मतदान केल्यानंतर, तसंच राजकीय क्षेत्रांमधील प्रतिनिधींनी नोंदवलेल्या तीव्र प्रतिक्रियांनंतर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी मार्शल लॉ उठवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाने मार्शल लॉ जाहीर केल्यानंतर सहा तासांनी लष्करी कायदा संपुष्टात आणण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली. मार्शल लॉ लागू करण्यासाठी एकत्रित केलेले सैन्य कर्मचारी आपापल्या तळांवर परतले आहेत. असं दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने यांनी स्पष्ट केलं आहे.