शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातल्या बाजार समित्या सक्षम करण्याचं आश्वासन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल दिलं. पुण्यात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. जागतिक बाजार समितीच्या धर्तीवर राज्याची पणन व्यवस्था स्पर्धात्मक करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. राज्यात काही आदिवासी भागात आणि 69 तालुक्यांमध्ये नव्यानं बाजार समिती निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी भविष्यात अधिकाधिक पारदर्शकता ठेवून आणि शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा पुरवून आकर्षित करावं असं रावल म्हणाले.
राज्यातल्या सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव तसंच स्थानिक आमदार आणि शासकीय अधिकारी परिषदेला उपस्थित होते.