भारतीय रेल्वेला अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल म्हणून लातूर मधला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना आता कार्यान्वित झाला आहे. भारतीय रेल्वेचा कायापालट करण्याच्या रेल्वे विकास मंडळाच्या वचनबद्धतेचं हे द्योतक आहे. या कारखान्याला वंदे भारत रेल्वे गाड्यांचे शयनयान व्यवस्था असलेले १ हजार ९२० डबे बनवण्याचं आणि पुढील ३५ वर्ष त्यांच्या देखभालीचं काम सोपवण्यात आलं आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार आणि कौशल्यवृद्धी होऊन २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याचं स्वप्न साकारण्यात मोठा हातभार लागेल अशी अपेक्षा आहे.
Site Admin | September 5, 2024 7:00 PM | Indian Railway | Marathwada