मराठवाड्यातल्या बेरोजगारी, पाणीटंचाई, यासारख्या समस्या सोडवण्यासाठी सरकार वचनबद्ध असून, कृषी, दळणवळण, उद्योग, पायाभुत सुविधा अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची प्रगती करणं हेच शासनाचं ध्येय आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर ते बोलत होते.
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये आज ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे, हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार, धाराशिव इथं तानाजी सावंत, जालना इथं अतुल सावे, बीड इथं धनंजय मुंडे, नांदेडमध्ये गिरीश महाजन आणि लातूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
तेलंगणामध्येही आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.