मतदार जनजागृतीसाठी आज रत्नागिरी शहरात मॅरेथॉन आयोजित केली होती. पोलीस मैदानातून सुरू झालेल्या या मॅरेथॉनची सांगता भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर झाली. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व नागरिकांनी ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे, मात्र त्यांची मतदानाची टक्केवारी कमी असते, असं सांगत जिल्ह्यातली मतदानाची टक्केवारी वाढण्याकरता सर्वांनी मतदानात सहभागी होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
Site Admin | November 10, 2024 3:16 PM | Ratnagiri | SVEEP
रत्नागिरीत मतदार जनजागृतीसाठी मॅरेथॉनचं आयोजन
