विविध विषयांतील माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली वाचनकक्षा रुंदावावी, असं आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केलं. मुंबई शहर ग्रंथोत्सवाचं उद्घाटन काल डॉक्टर गोऱ्हे आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. केवळ मोबाईलवर गुंतून न राहता रोज काहीतरी वाचन करा, समाजमाध्यमावर व्यक्त होताना कायद्याच्या चौकटीत राहून लिहिण्याचा प्रयत्न करा, चांगल्या लेखनाचा अनुभव घ्या असा सल्ला डॉक्टर गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना दिला. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचं ग्रंथालय संचालनालय, मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांनी हा ग्रंथोत्सव आयोजित केला आहे.
Site Admin | February 7, 2025 12:49 PM | उदय सामंत | डॉ. नीलम गोऱ्हे | मुंबई शहर ग्रंथोत्सव
मुंबई शहर ग्रंथोत्सवाचं मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उदघाटन
