डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आज मराठी पत्रकारिता दिन…

मराठी पत्रकारिता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जंयती आणि त्यांनी दर्पण हे पहिलं मराठी नियतकालिक सुरु केलं तो ६ जानेवारीचा दिवस दरवर्षी मराठी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आदरांजली वाहिली आहे.

 

मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार दिनानिमित्त आज संध्याकाळी आयोजित कार्यक्रमात पत्रकारितेसाठीच्या विविध पुरस्कारांचं वितरण, तसंच  दिनदर्शिकेचं प्रकाशन केलं जाणार आहे. 

 

पुण्यात काल मराठी पत्रकार संघानं राज्यातल्या पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकॅथॉनचं आयोजन केलं होतं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यावेळी उपस्थित होते. पत्रकार संघटनेनं यावर्षीच्या पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यवेधी संकल्पना निवडली आहे.

 

नाशिक जिल्ह्यात पत्रकार दिनानिमत्त वेगवेगळ्या संस्थांनी विविध कार्यक्रमांद्वारे बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला उजाळा दिला. नाशिक शहर पत्रकार संघानं आमदार देवयानी फरांदे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान केला.

 

रत्नागिरीत पत्रकार दिनानिमित्त ‘द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन’नं ‘स्पर्धा परीक्षा म्हणजे काय’ या विषयावर रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक नीलेश माईणकर यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा