राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा मुंबईत येत्या २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या कार्यक्रमात ५८ आणि ५९ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार यंदा एकाच वेळी प्रदान केले जाणार आहेत. त्याचबरोबर २०२३ चा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येतील.
Site Admin | August 19, 2024 9:39 AM | Marathi Film Awards